नागपूर महानगरपालिका यांनी टाकळी सिम फिडरवर 15 सप्टेंबर 2025 सकाळी 10 ते 16 सप्टेंबर सकाळी दहा या कालावधीत 24 तास जलपुरवठा बंद ठेवण्याची नियोजित केले आहे. या कालावधीत अंबाझरी नाल्यावर पाईपलाईन स्थलांतरासाठी दोन पाईपलाईन बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यादरम्यान गायत्री नगर झोन, टाकळी सिमझोन, जयताळा जी एस आर झोन, त्रिमूर्ती नगर झोन या ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे. नियोजित काम पूर्ण झाल्यानंतर जनपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येणार आहे