भारतीय जनता पक्षात वसई येथील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्यचे माजी नगरसेवक सरदार छोटू आनंद, राजू इसाई, युथ काँग्रेस माजी सरचिटणीस करणदीप सिंग, व्यावसायिक, माजी अधिकारी यांनी जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी आमदार स्नेह दुबे पंडित भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.