आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत अधिक कर्मयोगी या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पालघर जिल्ह्यात 654 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलीआहे. जिल्ह्यात 654 गावे आठ तालुक्यातील 396 कॅम्पसद्वारे एकूण 54,775 लाभार्थ्यांना पायाभूत सेवा पोहोचवण्यात यश आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.