सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी धरण हे नाशिक शहरालगत आहे. पिंपळद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गेल्या ४ वर्षांपासुन नाशिक महानगरपालिका हद्दीतील सिडको, अंबड, पाथर्डी, विल्होळी आदी आजुबाजुच्या ग्रामीण भागातील घरगुती व गणेश मंडळांचे गणेशमुर्ती व गणेशभक्त यांना वालदेवी धरणावर गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी गणेशभक्तांचे बुडुन मृत्यु होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जलप्रदुषण व ध्वनीप्रदुष