नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सुकवेल गाव परिसरातून २६ ऑगस्ट रोजी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या आई-वडिलांच्या रखवालीतून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.