कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची 18 संचालक पदासाठी आज दि.30 ऑगस्ट रोजी निवडणूक पार पडली असून यामध्ये एकूण 1591मतदारांपैकी 1542 मतदारांनी आपला हक्क बजावला होता,आ.बाळापूर ,पोत्रा पिंपळदरी या तीन मतदार केंद्रावर एकूण आठ बूथवर सरासरी 96.92% एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय कुठे यांनी आज सायंकाळी दिली आहे .