*हमदापुरमध्ये पडली तीन ते चार किलोची प्रचंड गार; गावात कुतूहलाची लाट, गार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी* हमदापुर परिसरात बुधवारी ता. 10 ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होताच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसादरम्यान गावालगत असलेल्या अंबादास वासनिक यांच्या शेताशेजारी तीन ते चार किलो वजनाची प्रचंड गार आकाशातून कोसळली. एवढ्या मोठ्या आकाराची गार थेट जमिनीवर पडल्याने गावभर चर्चेला उधाण आले आहे.