तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या अत्याचारामुळे सात महिन्यांची गरोदर राहिलेल्या १७ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान अकस्मात मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. पीडित मुलगी घरात असताना तिची प्रकृती अचानक बिघडली. ती अचानक बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले.