महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ नुसार बुलडाणा जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक -२०२५ अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.सदर अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट ८ (अ) व परिशिष्ट ८ (ब) या स्वरूपात तयार करण्यात आलेली असून ती आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता सर्व पंचायत समिती व तहसिल कार्यालयांचे सूचना फलक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.