२०२० साली घडलेल्या टाकाहारी येथील सोनाली एखंडेच्या मृत्यूप्रकरणातील तपासात दिरंगाई आणि आरोपींना मदत केल्याच्या प्रकरणात अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यावर नाशिक विभागीय पोलीस प्राधिकरणाने कारवाईचा बडगा उचलला आहे.मयत सोनाली हिचे माहेर गणोरे येथील असून संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह टाकाहारी येथे विहरीत आढळून आला होता.यानंतर अकोले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या मयत सोनालीचे वडील विजय आंबरे यांची प्रथम तक्रार नोंदवण्यास गेले असता टाळा