तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरामध्ये बिबट्याचे ठसे आढळले आहेत. गेल्या आठ दिवसापासून तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करत असल्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ही करण्यात येत आहे नळदुर्ग गावातील शोएब काझी यांच्या शेतामध्ये ३० ऑगस्ट रोजी चार वाजता हे ठसे घेण्यात आले आहेत.