यवतमाळ शहरातील नेताजी नगर परिसरातील एका युवकाच्या नावाने इंस्टाग्राम वर फेक अकाउंट बनवून त्याची बदनामी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. चंदन सुदाम हातागळे या नावाने instagram वर अकाउंट उघडून त्यावर स्वतःबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला अशी तक्रार युवकाने दिली.यावरून यवतमाळ शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.