नेहरू चौक परिसरासह वाडी भोकर रोड आणि वडेल रोड या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य पसरल असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्स ये जा करत असतात, आणि या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णांच्या जीवाला देखील धोका असल्याने सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी यांच्या नेतृत्वात रस्ता प्राधिकरण आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ तिरडी काढून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रशासनाची काढलेली तिरडी या आंदोलनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.