चाळीसगाव: गणेश विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेश मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगावने एक अभिनव मोहीम राबवली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत रांजणगाव व पिंपरखेड शिवारातील लालबर्डी धरणावर ही मोहीम घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान, धरणाच्या पाण्यात अर्धवट बुडालेल्या गणेश मूर्ती आणि काठावर अस्ताव्यस्त पडलेल्या मूर्तींना प्रतिष्ठानाने एकत्र केले. त्यांची विटंबना टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य मान देण्यासाठी या