कोपरगाव शहरातील व खडकी येथील युवक कार्यकर्त्यांनी आज १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला.अमोल शेळके, अतुल शेळके, सिद्धार्थ मंजुळे, प्रविण गायकवाड, रवी बारवकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे आ.काळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी नितीनजी शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.