ताथवडे-डांगे चौक ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री भरधाव वेगात जात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक डिव्हायडरवरून पलटी होऊन दुचाकीस्वारावर आदळला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणारा नितीन आटवे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पिंपरी चिंचवड पोलिस त्याचा शोध घेत आहेत.