घरगुती भांडणाच्या कारणावरून एका तरुणाने तणनाशक औषध पिऊन आत्म हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथे शनिवारी घडली. अण्णासाहेब पांडुरंग लोकरे (वय ३० वर्ष) असे त्या तरुणाचे नाव असून त्याने शनिवारी दुपारी राहत्या घरात तणनाशक औषध पिले याचा त्रास होऊ लागल्याने त्याला वडाळा येथे प्राथमिक उपचार करून सचिन यांनी येथील रुग्णालयात सायंकाळी दाखल केल.