आर. आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेअंतर्गत सन 2024 - 25 मधील तालुका सुंदर गाव पुरस्कार सोहळा सोमवार दि.8 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता पासून ते एक वाजता पर्यंत कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे संपन्न झाला. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत बेलदा या गावाची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सरपंच सौ स्नेहा भांडारकर व सचिव निवृत्ती नेवारे यांनी ग्रामपंचायत बेलदा तर्फे हा पुरस्कार स्वीकारला.