बार्शी तालुक्यातील सारोळा गावावर सध्या दुःखाची गडद छाया पसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले धोंडीराम चंद्रकांत भोसले वय ६० यांचा मृतदेह जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती तहसीलदार शेख यांनी ७ सप्टेंबर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दिली आहे. एका कष्टाळू शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.