उदगीर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला,या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,उदगीर तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पात पाणी साठ्यात मोठी वाढ झाली, देव नदीच्या रौद्र रूपाने पिकाचे अतोनात नुकसान झाले, शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झालाय,कर्ज काढून पेरणी केली,आता पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या,देव नदीचे सरळीकरण व रुंदीकरण केले असते तर शेतकऱ्यांची ही हाल झाली नसती,शेतकऱ्यांना सरकारने विशेष मदत देईल का असा प्रश्न देवर्जनचे शेतकरी बस्वराज रोडगे यांनी उपस्थित केलाय