सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी 30 ऑगस्टला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अजनी हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथे विद्यार्थिनीचा खून करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. हा खून प्रेम संबंधातून झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांनी दिली आहे.