दवाखान्याला जाते असे सांगून, सैदापूर, तालुका जिल्हा सातारा येथून, 31 वर्षीय विवाहित महिला, राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे, ही घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सैदापूर या ठिकाणी घडली आहे, या संदर्भात या महिलेच्या नातेवाईकांनी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता, सातारा तालुका पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिली आहे, या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार माने करत आहेत.