माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रोरो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली. मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.