कुरखेडा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये २८ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे, तहसीलदार राजकुमार धनबाते उपस्थित राहतील. सदर महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रूपाली जाधव यांनी केले आहे.