मागील अनेक दिवसापासून आलापल्ली ते शिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग बनत आहे परंतु हा महामार्ग बनत असताना निकृष्ट दर्जाचा बनत आहे असा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावरील डांबरी रस्ता उखडून पुन्हा तोच मलबा त्या ठिकाणी लावले जात आहे त्यामुळे अशा रस्त्याच्या दर्जा किती काळ टिकेल असा गंभीर सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे..