दिनांक 5 सप्टेंबरला सेवानिवृत्त शिक्षक,आदर्श शिक्षक,इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री विजयभाऊ रहांगडाले यांच्या वतीने ड्रीम गार्डन लॉन तिरोडा येथे आयोजित करण्यात आला.याप्रसंगी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. अनिलजी करवंदे अ.भा.क्रिडा व मानसशास्त्र संघटना अध्यक्ष हे होते तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य डॉ परिणयय फुके प्रामुख्याने उपस्थित होते.