नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी २ वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सर्व राज्यसभा, लोकसभा सदस्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेकडून स्पष्ट जनादेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन प्रचंड पाठिंब्याने निवडून आले असून, त्यांना विरोधकांपेक्षा जास्त मते मिळाल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.