आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी महावितरण कार्यालयाकडे चार ते पाच वर्षांपूर्वी डिमांड भरली होती. मात्र, इतका कालावधी उलटूनही अद्याप प्रत्यक्ष वीज कनेक्शन मिळालेले नाही, ही गंभीर आणि अन्यायकारक बाब आहे.