कोंढाळी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आडेगाव येथे नदीच्या किनाऱ्यावर टीनाच्या शेड मधून दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपीचे नाव कैलास वाघधरे असे सांगण्यात आले असून आरोपीकडून देशी व विदेशी दारू असा एकूण 11हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोंडाळी पोलीस करीत आहे.