शेतकऱ्यांच्या आनंदाचा सण पोळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. ता. 22 शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता सेलू नगरपंचायत द्वारा शहरातील आठवडी बाजार परिसरात बैलांचा पोळा भरविण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा स्नेहल देवतारे व मुख्याधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते बैलजोडी मालकांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता पोळ्याचा समारोप झाला.