शासनाच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे. तक्रारीला वाव न देता नवीन उपक्रम राबविण्यात प्राधान्य द्यावे. आणि उत्कृष्ट काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगण विकास साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती घोड्मिसे यांनी आज सोमवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हातात घेऊन विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत केले.