नागपूर शहरातून आत्ताची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आज दिनांक 12 सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मौंदेकर यांच्या वाहनाला अचानक आग लागली. सुदैवाने ते वाहनाच्या खाली उतरल्यामुळे थोडक्यात वाचले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर न्यायाधीश हे त्यांच्या कारने घरी परतत असताना त्यांच्या कारमधून अचानक धूर निघाला. थोड्या दूरवर गेले असता हा धूर वाढला दरम्यान न्यायाधीश खाली उतरले.