मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संत गजानन महाराज संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत गजानन महाराज यांच्या मुर्तीला दुग्ध अभिषेक करण्यात आला, त्यानंतर गावातून दिंडी पालखी सोहळा काढण्यात आला सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.