नई दिल्ली येथे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांची त्यांचे निवासस्थान कार्यालयात भेट घेऊन गोंडवाना विद्यापीठात आदिवासी विध्यार्थ्यांसाठी 500 मुलं व 500 मुलींचे स्वतंत्र वसतिगृह बांधण्यासाठी 232.80 कोटी रुपयाच्या मागणीचे पत्र देऊन लवकरात लवकर या बाबत निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल मागाच्या विकसाच्या अनुषंगाने चर्चा केली.