मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईमध्ये मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनामध्ये आंदोलनकर्तांची गैरसोय व्हावी यासाठी शासन जर अडथळे निर्माण करत असेल तर शासनाला मराठ्यांचा उद्रेक बघावयास मिळेल असा इशारा राहुरीतील सकल मराठा समाज बांधवांनी दिला आहे. याबाबत आज शनिवारी दुपारी राहुरीच्या तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.