पुसेसावळी: पुसेसावळी येथील जमदाडे गल्लीमध्ये एका घराला आग लावल्याची घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. भावाभावातील वादातून घराला आग लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.यामुळे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे आग आटोक्यात आली.किरण हरिभाऊ जमदाडे आणि विनोद हरिभाऊ जमदाडे हे दोघे भाऊ या घटनेत जखमी झाले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.