तालुक्यातील निमझरी शिवार परिसरात वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडे 12 वाजेच्या सुमारास निमझरी शिवारात झाडाझुडुपांमध्ये आढळून आल्याने त्यास डार्ट गनचा वापर करीत बेशुद्ध करण्यात आला. त्यानंतर त्यास जाळी च्या साहाय्याने जिवंत पकडून पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.