जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येत असलेले कचरा संकलन केंद्र तातडीने बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मनसेच्या शिष्टमंडळाने जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन सादर करून हा मुद्दा उचलून धरला.