टोरंट पॉवरच्या मनमानीविरोधात दिवा शहरात युवा प्रतिष्ठानने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास इशारा दिला आहे. युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी माहिती दिली आहे. 15 दिवसांत दरवाढ रद्द न झाल्यास जनआंदोलन पुकारले जाईल असं त्यांनी सांगितलं. मुंब्रा आणि दिवा शहरात टोरंट पॉवर आल्यापासून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अनेकदा आंदोलन देखील झाली. मात्र आता अमोल केंद्रे यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे.