चिंचवड येथील विद्यानगर परिसरात तीन तरुणांनी कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. तसेच त्यांनी एका व्यक्तीकडे खंडणीचीही मागणी केली. ही घटना सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री गोल्डन चौक, विद्यानगर येथे घडली.या प्रकरणी परशुराम रमाप्पा बसरकोड (५४, विद्यानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.