मजरेवाडी परिसरातील बेडर कनय्या नगर आणि कुमार नगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांना घसरून पडण्याच्या घटना घडत असून दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. शाळेत जाणारे लहान मुले, कामावर जाणारे नोकरदार व महिला यांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून रस्ता तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे