Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
खुलताबाद तालुक्यात बैलपोळा सण जल्लोषात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या श्रमसाथी बैलांची थाटामाटात सजावट करून त्यांची विशेष जपणूक केली. सकाळपासूनच स्नान, तेल मळणी, शिंगांना रंगरंगोटी व फुलांच्या माळांनी बैलांना आकर्षक रूप देण्यात आले. शहरातील मोठी आळी, लहाणी आळी, साळीवाडा, बाजार गल्लीसह गावोगावी पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. यंदा मंगेश मुळे यांच्या आकर्षक सजावटीच्या बैलाने "एक मराठा लाख मराठा" व "चलो मुंबई – २९ ऑगस्ट" या घोषणांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले