बार्शी तालुक्यातील भोयरे गावाजवळील दत्त मंदिर परिसरात माफियागिरीविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकार सागर गरड यांना थेट जीवाची धमकी मिळाली आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी १.३० वाजता काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या स्प्लेंडरवर आलेल्या तीन अज्ञात युवकांनी सागर गरड यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. "तू खूप माज दाखवतोस, तुला संपवून टाकतो," असे म्हणत आरोपी फरार झाले आहेत. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे.