धाराशिव शहरालगत असलेल्या कौडगाव तांडा येथे घरासमोर गोंधळ घालण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या पती व सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुहानी नितीन चव्हाण (वय २०, रा. कौडगाव तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या वतीने १३ रोजी २ सप्टेंबर रोजी देण्यात आली.