गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पोलिसांनी सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा उपक्रम नाशिक जिल्हाभरात कौतुकाचा विषय ठरला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी ह