गोराई खाडी जवळील मासोळी बाजाराच्या आवाराचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास आमदार संजय उपाध्याय यांच्या आमदार विकास निधीतून पार पडले. स्थानिक नागरिकांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळाव्यात आणि बाजार परिसर स्वच्छ व सुसज्ज राहावा या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी, चारकोप-गोराई मंडळ अध्यक्षा सुरेखा ठोके, वॉर्ड क्र. ९ अध्यक्ष अमित कदम तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.