महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. गोंडपिपरी तालुक्यातही तहसील कार्यालयातर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त समस्त तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान तहसीलदार शुभम बहाकर यांनी केले. तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालया मार