रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणारा एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला. पण कर्तव्य बजावत असलेल्या दोन आरपीएफ जवान आणि एका रेल्वे विक्रेत्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. ही ठराविक घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे.