अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पोलीस उपायुक्त लोहित मताणी यांनी जड वाहनांना शहरात प्रवेश एका ठराविक वेळेत करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु या आदेशामुळे वाहन चालक व मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आज हे वाहन चालक-मालक कामठी वाहतूक कार्यालयात पोहोचले आणि आपल्या मागण्या व समस्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यासमोर ठेवल्या.