सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील पंढरीनाथ किसन पालवे हे 5 सप्टेंबर रोजी शेतातून घरी पांदन रस्त्याने येत असतांना वर्दडी-चिंचोली रस्त्यावर प्रवेश करताच रस्त्याने जात असलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने पंढरीनाथ पालवे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.10 सप्टेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी किनगाव राजा पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केली आहे.